स्थलांतर...(कविता)

स्थलांतर...(कविता)
प्रेरणा: चंद्रशेखर राजपूत
वृत्त: समजाती-पद्मावर्तनीऱ्हरिभगिनी/स्वरगंगा मात्रा वृत्त
मात्रा: ८+८+८+६=३०मात्रा
******************************************************

पाखरांपरी पहा माणसे करू लागली स्थलांतरे....
पाठीवरती बिऱ्हाड त्यांच्या, पुन्हा एकदा नवी घरे!
चोचीमध्ये चारा त्यांच्या...भार शिरावर स्वप्नांचा!
डबडबत्या डोळ्यांनी घेती निरोप साऱ्या नात्यांचा!!
बालवयाचे, तरुणपणाचे क्षण सोडोनी जाताना.....
तुटे आतडे, एकेका त्या आठवणीने रडताना!
पुन्हा एकदा नवा प्रांत अन् नवे शहर ये वाट्याला!
पुन्हा एकदा काडी काडी जुळवत लागे कामाला!!
चिमणा जातो दूर....घराच्या कामासाठी जोमाने!
राबराबते चिमणी फिरुनी घरात नवख्या प्रेमाने!!
क्रमश: ...............

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१