मतदार यादीत आजच नाव नोंदवा

ही बातमी सकाळमध्ये वाचायला मिळाली.

मूळ बातमी : मतदार यादीत आजच नाव नोंदवा.

बातमीतले काही मुद्दे :

मतदान करणे हे कर्तव्य आहे.
 मतदान करायलाच हवे.
या साठीच "सकाळ'ने "आय विल
व्होट' या उपक्रमातून आपल्याला साद घातली आहे.
आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
यापूर्वी मतदान केले आहे
किंवा मतदार ओळखपत्र आहे, म्हणून गाफील राहू नये.
सध्याच्या मतदार यादीत
नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी.
 नसेल तर आजच (रविवार, ता. 9) नावनोंदणी
करावी.

निवडणूक आयोगाची रविवारी दिवसभराची नावनोंदणी मोहीम
 सकाळी 10
ते सायंकाळी 5 या वेळेत आपल्या घराजवळच्या मतदान केंद्रावर जाऊन नावनोंदणी
करावी.
नावनोंदणीसाठी जाताना आपल्या बरोबर
आपला रहिवासाचा दाखला व छायाचित्रासह ओळख सांगणाऱ्या कागदपत्राची (फोटो
आयडी) छायाप्रत (झेरॉक्स) व एक छायाचित्र न्यावी.
अठरा-एकोणीस
वर्षांच्या तरुण-तरुणींनी नाव नोंदवायला जाताना वयाचा दाखलाही सोबत नेणे आवश्यक.

सर्वांच्या माहितीसाठी ही माहिती येथे पुन्हा देणे आवश्यक वाटले.
धन्यवाद.