गराचा मेथांबा

  • कैरी १ मध्यम आकाराची, गूळ - १ वाटीभर, साखर - २ चमचे, मीठ , तिखट
  • फोडणीचे साहित्य : तेल २ चहाचे चमचे, मोहोरी, जिरे, हिंग, मेथ्या, मिरी -३ -४ दाणे, २ लवंगा,
  • कढी पत्ता,- १ काडी , लाल सुकी मिरची -२, हळद
१५ मिनिटे
३-४ जण

प्रथम कैरीची सालं काढून ती थोडं पाणी घालून कुकर मध्ये वाफवून घ्यावी,. थंड झाल्यावर गर वेगळा करून घयावा. त्यात गूळ, साखर , चवी पुरते मीठ व थोडे तिखट मिसळून एकजीव करावे.

जाड बुडाच्या पातेल्यात तेल व फोडणीचे इतर साहित्य घालून त्यात हा गर ओतावा व पटपट ढवळावे. गरज वाटल्यास अर्धा कप पाणी घालावे. खदखद उकळी येई पर्यंत शिजवावे व गॅस बंद करून झाकण टाकून मुरु द्यावे.
पोळी - पराठ्याबरोबर खायला चटकदार, आंबट गोड 'गराचा मेथांबा' तयार आहे!

नाहीत