निवडणूक

निवडणूक येता, नेता समोर येतो,
काय होईल प्रजेचे, प्रश्न समोर येतो. 
आमची तर आता, वाचाच बैसली हो,
जो पण कुणी येतो, साला मुजोर येतो. 
त्यांनीच लढवावी गादी, त्यांनीच जिंकावी निवडणूक,
जनतेच्या प्रश्नांचा, का कोणा विचार येतो.
मुर्ख करिती निर्णय, आमच्या भविष्यतेचा,
का माणसा असा तु, उगीच कमजोर होतो. 
का चाललासे खेळ, आपल्याच भावनांचा,
का बांधवा माराया, तो हाती अंगार देतो. 
जनसेवेची आता, वृत्ती लयास गेली,
फुकटात का कोणी, जीवना उदार होतो. 
आमच्या आदर्शा चे, आम्ही टांगिले फोटो,
नित्यनेमी त्यांना, आम्ही नमस्कार देतो.
का होतसे प्रदर्शन, आपल्याच षंडतेचे,
आम्हीच निवडून देतो, आम्हीच लाचार होतो.
पद्मनाभ