मे २०१४

प्रकाशन समारंभ: आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

१०/०५/२०१४ - सा. ६:००
आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे ही विनंती!

- नरेंद्र गोळे २०१४०५०६

Post to Feed
Typing help hide