जून २०१४

खमंग साबुदाणा थालिपीठ

जिन्नस

  • साबुदाणा १ वाटी
  • दाण्याचे कुट १ वाटी
  • १ इंच आले
  • १ चमचा तिखट
  • चिरलेली कोथिंबीर
  • १ मोठा बटाटा किसून
  • तूप

मार्गदर्शन

साबुदाणा प्रथम भिजवून घ्यावा. त्यासाठी एखाद्या भांड्यात साबुदाणा घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. सर्व पाण्याचा निचरा करून,  भाड्यावर झाकण ठेवून एखादा तास ठेवावे. शक्यतो साबुदाणा मोकळा भिजवावा.

भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कूट, किसलेला बटाटा, किसलेले आले, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी. त्यात २ चमचे तूप टाकून मळून घ्यावे. मध्यम आकाराचे साधारण ३-४ गोळे तयार करावेत.

एका पसरट तव्यावर प्रथम तूप लावून घ्यावे. मग त्यावर तयार केलेला गोळा हाताने थापावा. हाताच्या एखाद्या बोटाने थापलेल्या साबुदाण्यावर ५-६ भोके  पाडावीत. त्यात थोडे तूप सोडावे. मग तवा गॅसवर ठेवून तव्यावर झाकण ठेवावे.  चर्र आवाज आल्यावर आणि खालची बाजू लालसर भाजल्यावर उलटवावे.  दुसऱ्या बाजूने थोडेसे भाजून ताटात घ्यावे आणि लिंबाचे लोणचे आणि दह्याबरोबर जिभेला आणि पोटाला तृप्त करावे.

पाककृती आवडल्यास जरूर कळवावे.

- हेमंत

टीपा

नाही

माहितीचा स्रोत

आई

Post to Feedशंका
बटाटा
शंका (प्राथमिक)
इयत्ता तिसरीत साबुदाण्याची माहिती
श्री. व्यं. केतकरांचा ज्ञानकोश
उपयुक्त माहिती
साबुदाणा
धन्यवाद

Typing help hide