चवळी भात

  • एक वाटी चवळी
  • एक वाटी तांदूळ
  • आले लसूण वाटण
  • फोडणीचे साहित्य
  • तेल
  • मीठ
  • कोथिंबीर
३० मिनिटे
दोन जणांसाठी

चवळी कुकरमध्ये थोड्या जास्त पाण्यामध्ये शिजवावी आणि थंड करावी.
भात करून थंड होऊ द्यावा आणि मोकळा करावा.
तेल तापवून ते धुरावल्यावर ज्योत बारीक करून मोहरी, जिरे, ओवा, हळद, लाल तिखट यांची फोडणी करावी. ओवा थोडा सढळ हाताने घालावा.
त्यात आले-लसूण वाटण घालावे आणि पटापट हलवावे.
त्यात शिजवलेली चवळी (पाण्यासकट) घालावी आणि ज्योत मोठी करून फोडणी सगळ्या चवळीला लागेलसे हलवावे.
त्यात भात घालून सगळे नीट एकजीव करावे. पाणी थोडे जास्त असू द्यावे. पातळ खिचडी (वा बिसी बेळे भात) यासारखा प्रकार ठेवावा.
मिश्रण रटरटू लागले की ज्योत बारीक करून जरूरीपुरते मीठ घालावे आणि नीट हलवावे.
पाच मिनिटांनंतर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

सोबतीला पापड, कुरडई वा कडबोळी द्यावीत.

स्वप्रयोग