तन मन धन ...

तन मन धन ...

बालपण गेले कोशात
तारुण्य गेले जोशात
अर्धे आयुष्य संसाराच्या पाशात
उर्वरित देहाच्या नाशात

बालपण गेले अध्ययनात
तारुण्य गेले चयनात
अर्धे आयुष्य विचारांच्या मंथनात
उर्वरित आता चिंतनात

बालपण गेले मागण्यात
तारुण्य गेले कमाविण्यात
अर्धे आयुष्य गेले वितरणात
उर्वरित आता ऋणात

जीवनाचे एक सत्य....

राजेंद्र देवी