नाती सासरची

ऐका  वेगळ्या  जगात रमायला आवडलं,
बिचकलेल्या नात्यांना   हळुवार बांधायला  आवडलं,
काळ्या  रंगाला  सोनेरी छटा देताना , सप्तरंगांनी  नाहून  इंद्र-धनुष्याशी खेळताना आवडलं.....
जगाची रीत होती जुनी,  मात्र   नवे रेशिमधागे बुणायला आवडले ,
दुःखाच्या आणि एकटेपणाच्या आकांतात डुबले,  मात्र सुखाचे अश्रू  चाखायला  आवडले  ....
बारा वर्षासारखा  वनवास  , ऐका क्षणाला  घरपण  आणायला आवडले ,,
रोजच्या घुसमटीत  जीव  कोंडायचा,,  बंद  खिडकीच दार   खोलायला आवडलं.....
                   पण ,,,परंतु,,,, मात्र,,,,
माझी   हि  इच्छा ,,,,,  माझे  हे खेळ,,,,, माझ्या   ह्या   गाठी,,,,,
                  सुटायला  नको,,,, गुंतायला   नको,,,,,
आवडेल   मला  जपायला   .... आवडेल  मला  जोडायला..........

श्वेता वासणीक....