नरहर कुरुंदकर - तीन व्याख्याने

प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकरांची शिवाजीबद्दलची तीन व्याख्याने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तीनही व्याख्याने आवर्जून ऐकण्यासारखी आहेत. शिवाजीच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन कसे करावे याबद्दल अत्यंत मौलिक विचार त्यांनी मांडले आहेत. पहिल्या व्याख्यानात शिवाजीच्या  जन्मतारखेचा वाद कसा उत्पन्न झाला तसेच योग्य तारीख पुरावा असूनही मान्य न करणारे इतिहासकार कसे असतात हे सांगितले आहे.  तसेच शिवाजीपूर्व समाजात कोणते प्रवाह होते, तसेच मुसलमानी राज्याचे स्वरूप कश्या प्रकारचे होते हे सविस्तर सांगितले आहे. दुसऱ्या व्याख्यानात रामदासस्वामी आणि गागाभट्ट यांचे महत्त्व वर्णन केले आहे.   तिसऱ्या व्याख्यानात त्यांच्या मते शिवाजीच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची घटना/पर्व कोणते याबद्दल सांगितले आहे. अर्थात मी हे अत्यंत ढोबळपणे लिहिले आहे. व्याख्याने यापेक्षा कितीतरी जास्त विषयांना स्पर्श करतात. 

व्याख्याने मोठी आहेत, पण मनोगतींना आवडतील असे वाटते.

कुरुंदकरांचे १९८२ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले. पण त्यांचे विचार सार्वकालिक महत्त्वाचे आहेत.

कुरुंदकर भाग १ ( १ तास १० मिनिटे)

कुरुंदकर भाग २ (१ तास २५ मिनिटे)

कुरुंदकर भाग ३ (५५ मिनिटे)

विनायक