जिऱ्या-मिऱ्याचे पराठे

  • कणीक २ वाट्या, बेसन १/२ वाटी, जिरे, मिरे १ - १ चमचा
  • मीठ , तेल, तूप
१५ मिनिटे
२-३ जण

कणीक व बेसन एकत्र चाळावी. त्यात जिरे भाजून जाडसर वाटून व मिरी भरड कुटून टाकावे. तुपाचे मोहन घालावे. चवीनुसार मीठ घालून अर्धा तास भिजवून ठेवावे. नंतर, घडीच्या पोळ्या करतो (दोन तीनदा फोल्डस करुन) त्याप्रमाणे पराठे त्रिकोणी आकारात लाटून तव्यावर तेल सोडून खुसखूशीत भाजावेत. ताजे लोणी, लिंबाचे लोणचे अथवा पुदिना चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत. 

याबरोबर बटाट्याच्या काचऱ्याही छान लागतील.

वाटल्यास स्वाद यायला चिमूट चिमूट शेंदेलोण व पादेलोण वापरू शकतो मिठा सोबत.

फक्त खारटपणाचा अंदाज घ्यावा.
स्वतः