पालकाची हाटून भाजी

  • पालक एक जुडी
  • हरभरा डाळ व शेंगदाणे - प्रत्येकी एकेक मूठ - ३-४ तास भिजवलेले व नंतर वाफवून घेतलेले
  • बेसन २ चहाचे चमचे, फोडणीचे साहित्य, ३-४ लाल सुक्या मिरच्या, चिंच गूळ,
१५ मिनिटे
४ जण

प्रथम पालक निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. कढईत तेलाची फोडणी करून त्यात मेथी दाणे व लाल मिरच्यांचे तुकडे घालावेत. त्यावर पालक व डाळ-दाणे घालून मिक्स करावे व चांगले एकजीव शिजू द्यावे. चवी प्र्रमाणे मीठ, तिखट घालावे. चिंच गूळ घालावा व पुन्हा एक चांगली उकळी येऊ द्यावी. नंतर डाळीचे पीठ पाण्यात कालवून त्यात मिसळावे... पातळपणा अधिक हवा असेल तर पेला भर पाणी वाढवावे.... व परत उकळी येउ द्यावी. पळी वाढी भाजी असू द्यावी. 

गरम पोळी सोबत खावी. 
आळूच्या भाजी सारखी हवी असेल तर १०-१२  मुळ्याच्या चकत्या फोडणीत घालाव्यात व मूठभर आंबटचुका घालावा..चिंचे ऐवजी....
काही लोकांना आळूच्या भाजीचे तसेच चिंचेचे पथ्य असते.. त्यांच्या साठी पर्याय!!

भाजी एकजिनसी शिजणे आवश्यक आहे अन्यथा चोथा पाणी होते!

जाऊबाई