मार्च २०१५

थालिपीठाच्या भाजणीचे घावन

जिन्नस

  • थालिपीठाची भाजणी २ ते ३ मूठी
  • लाल तिखट १ चमचा, हळद अर्धा चमचा, चवीपुरते मीठ
  • अर्धा कांदा बारीक चिरलेला
  • पीठ भिजवण्यासाठी पाणी
  • तेल

मार्गदर्शन

वरील सर्व मिश्रण एकत्र करा व पीठ भिजवा. हे पीठ खूप पातळ भिजवा. गॅसवर तवा तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यावर चमच्याने थोडे तेल टाकून तवाभर पसरवा. नंतर डावेने भिजवलेले पीठ तवाभर  घाला. काही सेकंदाने त्यावर थोडे तेल टाका. शिवाय घावनाच्या कडेनेही तेल टाका. काही सेकंदाने  कालथ्याने घावन सोडवून मग ते उलटवावे. व नंतर परत थोडे तेल घाला व काही सेकंदाने घावन तव्यावरून काढा.टीपा

लोणच्यासोबत घावन खा.

माहितीचा स्रोत

मीच

Post to Feedजाळीदार
मोडले नाहीत?
धन्यवाद
मस्त
रोचक पाककृती
रोचक पाककृती
धन्यवाद

Typing help hide