राया...

मखमली मंचकी पसरली, मखमली काया,
नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥

करून बसले मंचकी थाट
किती दिवस पाहिली वाट
उगवेल आता चैत्री पहाट
सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट
अत्तराच्या लावल्या या समया
नका सोडून जाऊ.... ॥१॥

ल्याले शालू भरजरी
देह झाला आज शेवरी
ठेवा बाजूला तुम्ही शेला
घ्या अलगद कवेत मजला
जाईल ज्वानी माझी वाया
नका सोडून जाऊ.... ॥२॥

राजेंद्र देवी