मार्च
१३
२०१५
जिन्नस
- दूध - ५०० मिलि.
- साखर - ८ ट॓बल स्पून
- आईस्किम ईसेंन्स - १/४ टी स्पून
- जी एम एस पावडर - १ ट॓बल स्पून + १ टी. स्पून
- सी एम सी पावडर - १/४ टी स्पून
- कॉर्न फ्लोर -१ ट॓बल स्पून + १ टी. स्पून
- सिताफळांचा गर - १ वाटी किंवा १० मध्यम आकारांच्या सिताफळांचा गर
- अॅल्युमिनियमचा डबा झाकणासहित
मार्गदर्शन
१. प्रथम एका स्टीलच्या पातेल्यात दूध, साखर, GMS Powder , CMC Powder, cornflour एकत्र करा.
२. पातेलं गॅसवर मंद आचेवर ठेवा व सतत चमच्याने ढवळत राहा.
३. १० मिनिटांनी मिश्रण थोडं दाट होईल. गॅस बंद करून त्यात आईसक्रीम इसेन्स घालून ढवळावे.
४. मिश्रण थंड झाल्यावर अॅल्युमिनियमच्या डब्यात ओतून झाकण लावून डबा डीप फ्रीजर मध्ये ठेवा आणि डीप फ्रीजर HIGH वर ठेवा.
५. ६ तासांनी आईसक्रीम सेट होईल.
६. सेट झालेल्या मिश्रणाचे दोन भाग करा.
७. अर्ध मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून ५ मिनिटे फिरवावं.
८. उरलेल्या अर्ध्या मिश्रणात अर्धी वाटी सीताफळाचा गर घालून, मिक्सरच्या भांड्यात घालून ५ मिनिटे फिरवावं.
९. अॅल्युमिनियमच्या डब्यात दोन्ही मिश्रण घालून त्यात उरलेला सीताफळाचा गर घालून, मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळा.
१०. डब्याला झाकण लावून डीप फ्रीजर मध्ये ठेवा आणि डीप फ्रीजर MEDIUM वर ठेवा.
११. मिश्रण ४ तासांनी सेट होते.

टीपा
अॅल्युमिनियमचा डबा झाकणासहित नसेल तर केकच अॅल्युमिनियमच भांड वापरावं व त्यावर एक ताट ठेवा.
१ ते ५ क्रमवार पाककृती हि बेसिक आइसक्रीमची आहे.
क्रमांक ६ पासून तुम्ही वेगवेगळी फळ (स्ट्रॉबेरी, आंबा, चिकू, काळी द्राक्ष), काजू, बदाम, पिस्ता, काळी मनुका, चॉकलेट, कोको पावडर घालून आइसक्रीम तयार करू शकता.
माहितीचा स्रोत
आईस्क्रिमचा कोर्स
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
सी एम सी
प्रे. मराठीप्रेमी (सोम., १६/०३/२०१५ - १०:३६).
ह्यातुन किती कप आईसक्रिम बनेल बाप्पा ?
प्रे. डेटिंगक्लब (गुरु., ०८/०९/२०१६ - ०५:१२).