स्तंभ

प्रश्न तर प्रश्नच असतो

आधी विचारला काय 
नंतर विचारला काय 
वेळ गेल्यावर विचारला काय?
उत्तराच्या अपेक्षेत तो 
स्तंभासारखा उभा असतो 
"अशोक स्तंभ! "
विजयाचा स्तंभ.....?  
की एक प्रश्न.....?
अनुत्तरित राहिलेला 
अशोकाला पडलेला
की त्याने लोकांना 
विचारलेला?  
जणू,  माणुसकीचा दृष्टिकोन कोणता?
पाहणारे उत्तरासहित येतात
पण प्रश्नाचे अमर्याद रूप पाहून 
तसेच परत जातात
प्रश्न मात्र उभाच " स्तंभासारखा "
जगाच्या अंतापर्यंत...............