आयुष्याची भूमिती

आयुष्याची भूमिती

(एकादमात - ब्रेथ्लेस कविता)

पृथ्वीच्या परिघात
दिशांच्या चौकोनात
आमच्या प्रेमाच्या
सत्य व काल्पनिक
बाजू असलेल्या
समद्विभुज त्रिकोणातील
कर्णाच्या मध्यबिंदूतून
छेद देणारी रेषा
परिघाला जेथे मिळते
तेच माझ्या आयुष्याच्या
भूमितीचे साध्य आहे

राजेंद्र देवी