तुझ्याविना..

तुझ्याविना..

तो नेहमी शांत अन
धीरगंभीर असायचा
कधी कधी तो
स्मित हास्य पण हसायचा

एकदा मी सारे त्याला
माझ्या मनातले सांगितले
अन टचकन त्याच्या डोळ्यात
अश्रू उभे राह्यले

मला खरं तर त्याला
रडवायचे नव्हते
पण खरं सांग देवा
तुझ्याशिवाय मला दुसरे कोण होते?

राजेंद्र देवी