शिवस्तुती

आदिदेव महादेव नटभैरव नटरंग

करी तांडव आंदोलन होई भयकंपन 
नटराज पंचवदन अतिरुद्र महांकाल
दशहस्त काळाग्नी रुद्र गळा सर्पाभरण 
महातत्व महाप्रचंड जाळितसे मदन वदन
विरक्त महायोगी  महागुरू जगत्कारण 
भूतगण शिवगण पूजिती मायेसहित गजानन  
भावभोळा शिवशंकर होई वरदायक 
देई शुद्ध भक्ती मुक्ती आम्हा  तारक
गंगाधरसुत म्हणे होई मज आश्वासक