जुलै २५ २०१५

ऋणनिर्देश


सध्या मी मधूनमधून भाषांतराचे काम करते. माझ्याकडे येणाऱ्या कामात मुख्यत: आरोग्यविषयक, शिक्षणविषयक सरकारी योजनांसंबंधीची इतिवृत्ते असतात. ही भाषांतरे करताना मला मनोगताच्या ’पारिभाषिक शब्द’ ह्या सुविधेचा खूप उपयोग होतो. त्या सुविधेचा वापर करून एखादा शब्द शोधताना आपण तो एखाद्या विशिष्ट कोशात -जसे न्यायव्यवहार कोश, शिक्षणशास्त्र, बॅंकिंग-  शोधा असेही सांगू शकतो. त्यामुळे आपल्याला त्या त्या संदर्भातील प्रतिशब्द/अर्थ कळतो.

प्रशासकांनी तळटीप लिहिली आहे की  "मराठीभाषा डॉट कॉम ह्या संकेतस्थळाच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या विदागारावर आधारित."  परंतु प्रत्यक्ष मराठीभाषा.कॉम हे संकेतस्थळ मला तरी वापरायला फारसे सोयीचे वाटले नाही. त्यामुळे मनोगतावरील सुविधेचे विशेष महत्त्व आहे.

ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासकांचे आभार

Post to Feedहेच
मराठीभाषा डॉट कॉम नव्हे तर

Typing help hide