फॉल कलर्स

नमस्कार मंडळी,अमेरिकेत आल्यावर निसर्गाची मला सर्वाधिक आवडणारी किमया म्हणजे फॉल (पानगळ) सीझनमधली रंगाची मुक्त उधळण. गेल्या काही वर्षात मी माझ्या कामचलाउ छायाचित्रण कौशल्याने जे काही दृश्यानुभव टिपू शकलो ते आज इथे तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. माझा हा प्रयत्न कृपया गोड मानून घ्या. अमेरिकेत नवा असताना बरोबरच्या मित्रांनी ऑरगन राज्यातली फॉल कलर्स पाहण्याचा बेत आखून सर्व बुकींग केले. आमच्या दुर्दैवाने त्या वर्षी फॉल कलर्स अंमळ उशीराने सुरू झाले व प्रत्यक्ष फारसे काही पाहायला मिळू शकले नाही. एका ठिकाणी जरा वाळकी पाने दिसली त्यापैकी एक पान कारच्या बॉनेटवर ठेवून फोटो काढला.माझ्या हापिसच्या इमारतीमागच्या परिसरातलेकाही फोटोजपुढचे दोन फोटोज मेपल ग्रोव्ह मिनेसोटा येथील राइस लेकच्या परिसरातले.      वुडबरी मिनेसोटा मधला एक गोल्फकोर्स  फॉल कलर्सने नटलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरापासून लांबवर डोंगराळ भागात जावे लागते. आमच्या शहरापासून चार साडेचार तासांच्या अंतरावर ल्युटसन माउंटेन्स हे ठिकाण आहे. फॉल कलर्सचा तीन चार आठवड्यांच्या जो कालावधी असतो त्यात दोन तीन दिवस जेव्हा नारिंगी रंग दिसतो तो सर्वोत्तम काळ असतो. चाकरमान्यांचे सुदैव असेल तर तो शनिवार रविवारी येतो. अन्यथा दोन विकांतांच्या दरम्यान संपून जातो. तसेच आभाळी वातावरणही रसभंग करते.                    एके वर्षी गुरुवार व शुक्रवारी झालेल्या वादळामुळे अधिक वाळलेली नारिंगी रंगाची पाने उडून गेली अन तेव्हा शनिवारी आम्हाला दिसलेले ल्युटसन माउंटेन्स येथील फॉल कलर्स.            त्याच्या पुढल्या वर्षी नेमके शनिवार पर्यंत नारिंगी रंगाची पाने नाहीशी होऊन गडद तांबडा रंग दिसू लागला.      नागरी वस्तीच्या परिसरातही एखादे सुंदर झाड दिसते.       मेपल ग्रोव मिनेसोटा येथील वीव्हर लेकच्या परिसरातले एका संध्याकाळचे हे दृश्य. सेंट पॉल मिनेसोटा येथील कॅपिटॉल ग्राउंड्सच्या परिसरातल्या काही फोटोजने समारोप करतो.  पाच दिवसांपूर्वीच उत्तर अमेरिकेतला फॉल सीझन सुरु झालेला आहे. उत्तर अमेरिकेतल्या मनोगतींना विनंती करतो की त्यांनी काढलेले फॉल कलर्सचे फोटोज या धाग्यावर किंवा स्वतंत्र धाग्याच्या स्वरुपात प्रकाशित करावे. पुढच्या काही आठवड्यांत मला संधी मिळाली तर मी देखील नवे फोटो काढून इथे प्रकाशित करीन.