मत लेखी मागणे गैर आहे का?

मी काही मित्रांकडून  खालीलप्रमाणे ऐकले आहे-
   स्वतःच्या कार्यालयात एखादा प्रस्ताव आपण तयार करतो. तो वरिष्ठांकडे पाठवतो. त्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक मत कधी कधी लेखी दिले जाते. कधी कधी तोंडीच दिले जाते. टिप्पणी लेखी द्या, असे विनवले तर - एकदा सांगितले ना, नाही म्हणजे नाही. लेखी मागायचा तुम्हाला अधिकार नाही. लेखी द्यायचे की नाही द्यायचे, आम्ही ठरवू- इत्यादी इत्यादी उत्तरे देऊन बोळवण केली जाते. 
  मलाही एकदा असाच अनुभव आला होता. टिप्पणी तोंडी दिली गेली पण लेखी देण्यास वरिष्ठ राजी नव्हते.
  कोणत्याही प्रस्तावावर अमुक काळात काय निर्णय घेतला गेला, काय चर्चा झाली याची नोंद भविष्यात उपयोगी पडते, असाही एक पैलू या लेखी नोंदींना असतो.  
  अर्थात, याला अपवाद  असतीलच. टिप्पणी नकारात्मक असेल तर अंमळ अधिक टाळाटाळ केली जाते, असे वाटते. 
   
  प्रश्नः  मत लेखी मागणे गैर आहे का?