ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
अंकुशहा शब्द तत्सम आहे. याचा अर्थ नियंत्रण, मर्यादित, हत्तीला ताब्यात आणण्याचे हत्यार. या शब्दात 'क'ला पहिला उकार द्यावा. काही वेळा अनुस्वार न देता 'क' ला न लावून 'अन्कुश' असे लिहितात. असे लिहिणे चुकीचे आहे.
अंकुशहत्तीला ताब्यात ठेवण्यासाठी जे हत्यार माहुताकडे असते, त्याला अंकुश म्हणतात. ते एका बाजूला आकडीसारखे वळविलेले असते. अमुक व्यक्तीवर अंकुश ठेवणे म्हणजे त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे. निरंकुश या शब्दाचे अर्थ स्वच्छंदी,अनियंत्रित, स्वैर असे आहेत. अंकुश व निरंकुश या दोन्ही शब्दात क ला पहिला उकार आहे. तो दुसरा देण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.
अक्रीतअसंभवनीय, उफराटे या अर्थांनी अक्रीत हा शब्द वापरला जातो. प्रतिकूल, मोफत, विपरीत, अतिशय, बेसुमार हेदेखील त्याचे अर्थ आहेत. हा शब्द चुकून आक्रित , अक्रित वा आक्रीत असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दातील पहिले अक्षर आ नसून अ आहे; तसेच क्र वर दुसरी वेलांटी आहे; हे ध्यानात टेवावे. अक्रीत घेणे म्हणजे एखादी वस्तू बेसुमार किंमत देऊन विकत घेणे.
अक्षतापूजेसाठी, तसेच मंगलकार्यात; औक्षणप्रसंगी वापरल्या जाणार्‍या कुंकूमिश्रित तांदळांना अक्षता म्हणतात. अक्षत हा मूळ संस्कृत शब्द. ते विशेषण म्हणून वापरले तर दु:खविरहित, सुरक्षित असे त्याचे अर्थ होतात. अ+क्षत अशी त्याची फोड आहे. (क्षत म्हणजे जखम.) कल्याण हादेखील अक्षत या संस्कृत नामाचा एक अर्थ आहे. अक्षता हा शब्द अक्षदा असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.
अखंडितसतत चालू असलेल्या क्रियेचे वर्णन करण्यासाठी अखंडित हे विशेषण वापरले जाते. अखंडित हा शब्द खंडितच्या उलट अर्थी आहे. खंडित म्हणजे तुकडे झालेले. खंड म्हणजे तुकडा. खंडित, खंड या शब्दांचा उगम खंड् या संस्कृत धातूत आहे. तोडणे, फोडणे, नाश करणे, हे या धातूचे अर्थ. खंडित व अखंडित या दोन्ही शब्दांत डवर पहिली वेलांटी आहे. (खंडीत,अखंडीत असे लिहिणे चूक.)
अगत्यआस्था, आदर, कळकळ या अर्थांनी अगत्य हा शब्द वापरला जातो. अगत्यपूर्वक बोलावणे या शब्दप्रयोगात हा अर्थ अभिप्रेत असतो. अत्यंत आवश्यकता, हादेखील अगत्य या शब्दाचा एक अर्थ आहे. हे काम होणे अगत्याचे आहे, असे म्हटले जाते, तेव्हा हा अर्थ अभिप्रेत असतो. अगत्य या शब्दातील पहिले अक्षर आ नसून अ आहे, हे ध्यानात घ्यावे. (आगत्य असे लिहिणे चूक.)
अंगुष्ठहा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे अंगठा. 'ष्ट' आणि 'ष्ठ' लिहिताना नेहमीच घोटाळा होतो. शब्द संस्कृत असेल, तर मूळ शब्दाप्रमाणेच लिहिण्याचे भान ठेवावे. या शब्दातदेखील 'ग'ला पहिला उकार व 'ष' ला 'ठ' जोडून लिहावा. अंगुष्ट असे लिहू नये.
अग्रिमअग्रिम हा शब्द इंग्रजीतील ऍडव्हान्स शब्दाला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. अग्रिम हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अग्र या शब्दापासून तो बनला आहे. अग्रच्या अर्थांमध्ये पहिला, पुढे आलेला आदींचा समावेश आहे. 'आधीचा', पहिला, श्रेष्ठ, प्रथम पिकलेला, हे अग्रिमचे अर्थ आहेत. अग्रिम वेतन म्हणजे आगाऊ दिलेले वेतन. रक्कम या संदर्भातच या शब्दाचा प्रामुख्याने वापर होतो.
अजितअजित म्हणजे अजिंक्य. जित म्हणजे पराभूत; जिंकला गेलेला. त्याच्या उलट अर्थांचा शब्द अजित(अ + जित). विष्णू, शिव, बुद्ध असेही 'अजित'चे अर्थ आहेत. या शब्दात 'ज'वर पहिली वेलांटी आहे. चुकून ती दुसरी दिली गेली, तर अर्थ बदलतो. 'अजीत'चा अर्थ 'न कोमेजलेले' असा आहे. अपराजित याही शब्दाचा अर्थ अजिंक्य. 'अपराजित'मध्येही जवर पहिली वेलांटी आहे.
अतिथीहा शब्द तत्सम असल्याने, संस्कृतमध्ये या शब्दात थला पहिली वेलांटी असते. असे कितीतरी संस्कृतशब्द मराठीत वापरले जातात. मराठीत मात्र या शब्दांचे मराठीच्या नियमाप्रमाणे अंती येणारे इकार, उकार व वेलांटी दीर्घ ठेवले जातात. म्हणून अतिथिहा शब्द अतिथी असा लिहिला जातो. सामासिक शब्दात मात्र हे शब्द पूर्वपदी आल्यावर ह्र स्वान्त लिहावेत. उदा. अतिथिगृह.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide