ऑक्टोबर १३ २०१५

डाळीचे वाफले

जिन्नस

  • तूर डाळ १ वाटी
  • आले लसूण मिरची पेस्ट - २चमचे, तिखट- मीठ, कोथिंबीर चिरलेली, जिरे पूड - २ चिमूट

मार्गदर्शन

तूर् डाळ स्वच्ह धुवून पाण्यात ५-६ तास भिजत घालावी . नंतर चाळणीत उपसून ठेवावी. थोड्या वेळाने मिक्सर वर वाटून घेऊन त्यात आले लसूण मिरचीची पेस्ट, तिखट , मीठ, कोथिंबीर  घालून मिक्स करून घ्यावे. 
एका मोठ्या पातेलीत (वर चाळणी बसेल अशा) पाणी उकळायला ठेवून चाळणीला थोडा तेलाचा हात लावून डाळीचे चपटे वडे थापून त्यात ठेवावे. 
झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढावी व गरम गरम खावे.

वाटल्यास सोबत चटणी, सॉस किंवा सूप घ्यावे!हा पदार्थ अजिबात तेल न वापरता केला असल्याने डाएट ला योग्य आहे!  
मिश्र डाळी पण वापरता येतील.

टीपा

तिखट मीठ व आले लसूण थोडे सढळ हस्ते घालावे.
शक्यतो गावरान तूरडाळ (साली सकट) मिळाल्यास अधिक चांगले.

माहितीचा स्रोत

स्वतः

Post to Feedपण
लतापुष्पा

Typing help hide