वजने आणि मापे

काही दिवसांपूर्वी पु. लं. चं "बटाट्याची चाळ" वाचत होतो. त्यात "उपास" की अन्य कोणत्या प्रकरणात "रत्तल" हे वजनाचं परीमाण वाचण्यात आलं. तशी "चाळीची" पारायणं झालीत, रत्तल हा शब्द असंख्यवेळा वाचलाही, पण का कुणास ठाऊक एक रत्तल म्हणजे किती ग्रॅम हे कुतूहल जागं झालं. आपल्या मनोगतींपैकी कुणाला माहीत आहे का? 

हे माहीत झाल्यावर मी फार ज्ञानी होईन किंवा मग तिथून पुढे मी रत्तलातच बोलीन असं नव्हे पण डोक्यातली एक मुंगी कमी होईल, एवढेच.
आगाऊ धन्यवाद,
कृष्णकुमार द. जोशी.