ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
अतीतअतीत म्हणजे होऊन गेलेले, दूर गेलेले. मागे टाकणारे असाही त्याचा एक अर्थ आहे. कालातीत म्हणजे काळाला मागे टाकणारे; काळापलीकडचे. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडचे. अतीत, कालातीत, शब्दातीत या सर्व शब्दांत तवर दुसरी वेलांटी आहे हे लक्षात घ्यावे. (अतित, कालातित, शब्दातित असे लिहिणे चुकीचे.) व्यतीत हाही शब्दाचा अर्थ होऊन गेलेले असा आहे. त्याही शब्दात ती दीर्घ आहे.
अत्युच्चअतिउच्च अशी अत्युच्च या शब्दाची फोड आहे. दोन्ही शब्द संस्कृतमधून आले आहेत. फार, अधिक, जास्त, अतिशय हे अतिचे अर्थ आहेत. उच्च म्हणजे उंच. अत्युच्चमधील दोन्ही जोडाक्षरे नीट लक्षात ठेवावीत. हा शब्द अत्त्युच्च असा लिहिणे चुकीचे आहे. (तची दुरुक्ती नाही.) अखेरचे अक्षर च्य असे लिहिण्याची चूक (अत्युच्य) टाळावी. काहींच्या हातून दोन्ही चुका (अत्त्युच्य) होऊ शकतात. शब्दाची फोड लक्षात घ्यावी.
अधिदैवतसंस्कृत उपसर्ग लागून काही शब्द तयार झाले आहेत. या शब्दांत 'अधि' हा उपसर्ग आहे. याचा अर्थ आहे मुख्य, श्रेष्ठ. 'अधिदैवत' म्हणजे मुख्य दैवत. या शब्दात मूळ शब्दाप्रमाणे 'ध'ला पहिली वेलांटीच द्यावी. अधीदैवत, आधिदैवत असे लिहू नये.
अधिदैवतसंस्कृत उपसर्ग लागून काही शब्द तयार झाले आहेत. या शब्दात 'अधि' हा उपसर्ग आहे. याचा अर्थ आहे मुख्य, श्रेष्ठ. 'आधिदैवत' म्हणजे मुख्य दैवत. या शब्दात मूळ शब्दाप्रमाणे 'ध'ला पहिली वेलांटीच द्यावी. अधीदैवत, आधिदैवत असे लिहू नये.
अधीक्षकअधीक्षक या शब्दाचा खरा अर्थ देखरेख करणारा. हे सरकारी विभागांतील वा खासगी संस्थांमधील एक अधिकारपद आहे. सुपरिंटेंडंट या शब्दाला हा प्रतिशब्द आहे. अधि+ ईक्षक अशी याची फोड आहे. ईक्षक म्हणजे पाहणारा. अधिया उपसर्गाचा अर्थ वर, वरच्या बाजूस असा आहे. अधीक्षक या शब्दात ध वर दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवावे. (अधिक्षक असे लिहिणे चूक.)
अध्याहृतअध्याहृत या शब्दाचा अर्थ गृहीत धरलेले . त्याचा उल्लेख प्रत्यक्ष केलेला नसतो; पण अर्थ समजून घेताना ते लक्षात घ्यायचे असते. हा शब्द लिहिताना त्यातील ध्या ऐवजी ध्य लिहिले जाण्याची चूक होऊ शकते. (अध्यहृत); ती टाळावी. अध्याह्रत, अध्याऋत, अध्यारूत अशाही चुका होण्याची शक्यता असते. त्या टाळण्यासाठी हृ हे अक्षर नीट लक्षात ठेवावे . या शब्दाचे पहिले अक्षर 'आ' नसून 'अ' आहे, हेही ध्यानात घ्यावे.
अनभिज्ञपरिचय नसलेला, अजाण या अर्थी अनभिज्ञ हे विशेषण वापरले जाते. अभिज्ञ म्हणजे जाणणारा. अनभिज्ञ हा शब्द अभिज्ञच्या विरुद्धअर्थी आहे. या दोन्ही शब्दांत भवर पहिली वेलांटी असते, हे लक्षात ठेवावे. अनाभिज्ञ असे लिहिणे चुकीचे आहे, हेही ध्यानात घ्यावे. अभिज्ञात असाही एक शब्द आहे. पूर्ण माहीत असलेले, असा त्याचा अर्थ आहे.
अनसूयाअनसूया हे नाव तुम्ही ऎकले असेल. अनुसया असाही शब्द ऎकला असेल. अनुसया हा अनसूया चा अपभ्रंश. अनसूया हा शब्द शुद्ध. तो लक्षात राहण्यासाठी त्याची फोड (अन् + असूया) लक्षात घ्यावी. यात न् आणि अ यांचा संधी होऊन न झाला आहे. अन् हा नकारार्थी उपसर्ग. असूया म्हणजे मत्सर, निंदा. अनसूया म्हणजे निर्मत्सरी, निष्कपटी. अनसूयक या विशेषणाचाही तोच अर्थ आहे.
अनावृतआवरण नसलेले, उघडे, जाहीर, प्रकट या अर्थांनी हे विशेषण वापरले जाते. वृ या संस्कृत धातूपासून हा शब्द बनला आहे. वृ चा अर्थ आच्छादणे असा आहे. आवृत म्हणजे आच्छादलेले; आवरण घातलेले. 'आवृत'च्या उलट अर्थाचा शब्द अनावृत. पण 'अनावृत्त' म्हणजे मात्र आवृत्ती नसलेला; पुन्हा न येणारा. अनावृत या शब्दाशी अनावृत्त या शब्दाचा काहीही संबंध नाही.
अनिर्वचनीयअनिर्वचनीयचा अर्थ आहे अवर्णनीय. अनिर्वाच्य असाही शब्द याच अर्थाने वापरतात. एखाद्या गोष्टीचे वर्णन शब्दांत करणे अवघड असते तेव्हा केवळ अवर्णनीय असे म्हटले जाते. हा शब्द लिहिताना अनिरवचनीय, अनीर्वचनीय, अर्निवचनीय असा चुकीचा लिहिला जाण्याची शक्यता असते. नला पहिली वेलांटी व रफार ववरच द्यावा.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide