ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
उपाहारउपाहार (उप + आहार) म्हणजे फराळ. (इंग्रजीत रिफ्रेशमेंट.) उपाहारगृह हा शब्द त्यावरून बनला आहे. त्यात 'उपाहार' ऎवजी उपहार असे चुकीचे लिहिलेले तुम्ही पाहिले असेल. येथे 'पा' चा प झाला की अर्थ बदलतो. उपहार हादेखील संस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ (भेट, देणगी, आहुती, आरास, आनंद इत्यादी) आहेत. भेट वा देणगी या अर्थी तो हिंदीत वापरला जातो.
उर्वरितउर्वरित म्हणजे बाकी राहिलेले, शिल्लक, अवशिष्ट. या शब्दात र वर पहिली वेलांटी आहे आणि उ र्‍हस्व आहे. (उ उखळातला), या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्यात; म्हणजे ऊर्वरित किंवा उर्वरीत किंवा ऊर्वरीत असे लिहिण्याची चूक होणार नाही. उर्वरितला उरवई हा एक मराठी प्रतिशब्द आहे परंतु तो वापरात असल्याचे आढळत नाही. उरणे म्हणजे बाकी राहणे, शिल्लक राहणे, हे तुम्हाला माहीत आहेच.
उष्णउष्ण म्हणजे गरम, हे आपल्याला माहीत आहे. दाहयुक्त, तिखट हेदेखील उष्णचे अर्थ आहेत. हा शब्द अनेक जण चुकून ऊष्ण असा उच्चारतात व लिहितानाही ती चूक होते. ती टाळण्यासाठी उष्णमधील पहिले अक्षर नीट लक्षात ठेवावे. उष्णता याही शब्दात उ र्‍हस्व आहे. ऊन (सूर्यकिरणाचा प्रकाश) या शब्दात मात्र ऊ दीर्घ आहे. ऊन हे विशेषणदेखील आहे व त्याचा अर्थ गरम असाच आहे.
ऊर्ध्वऊर्ध्व या शब्दाचा अर्थ उंच, वर , वरील. मरणापूर्वी लागलेली घरघर, असाही त्याचा एक अर्थ आहे. ऊर्ध्वपातन हा रसायनशास्त्रातील शब्द तुमच्या परिचयाचा असेल. ऊर्ध्व या शब्दात, तसेच ऊर्ध्वपातन, ऊर्ध्वगती (उंच उडण्याची वा चढून जाण्याची क्रिया), ऊर्ध्व मुख (वर तोंड करून पाहणारा) अशा सामासिक शब्दांत ऊ दीर्घ आहे, हे ध्यानात ठेवावे. चुकून तो र्‍हस्व लिहिला जातो ते टाळावे.
ऊर्मीऊर्मिया संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत, हा शब्द प्रामुख्याने लाट, उसळी, इच्छा, उत्कंठा या अर्थांनी मराठीत वापरला जातो. मराठीत अंत्याक्षर दीर्घ लिहायचे, म्हणून हा शब्द 'ऊर्मी' असा लिहायचा. मात्र यातील पहिले अक्षरदेखील दीर्घ आहे, ही लक्षात ठेवायची गोष्ट. हा शब्द चुकून 'उर्मी' असा लिहिला जाण्याची दाट शक्यता असते. ऊर्मिला या नावातदेखील पहिले अक्षर दीर्घच आहे.
ऋजूसरळ स्वभाव असलेला, प्रामाणिक, साधा-भोळा हे ऋजू या विशेषणाचे अर्थ आहेत. (संस्कृत शब्द ऋजु. मराठीत अंत्याक्षराचा इकार वा उकार दीर्घ असल्यामुळे हा शब्द ऋजू असा लिहायचा.) ऋचा उच्चार अनेक जण चुकून रु असा करतात. त्यामुळे हा शब्द रुजू असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. ऋजुता म्हणजे प्रामाणिकपना, सरळपणा. ऋजुतामध्ये जु र्‍हस्व आहे, हे ध्यानात ठेवावे.
एकाहत्तरएकाहत्तर ही संख्या आपल्या परिचयाची आहे; परंतु ती अक्षरी लिहिताना मात्र चूक होण्याची शक्यता असते. या चुकीचे मूळ चुकीच्या उच्चारणात आहे. अनेक जण ही संख्या एक्काहत्तर अशी उच्चारतात. त्यामुळे लिहितानाही ते तीच चूक करतात. या शब्दात क ला क जोडलेला नसून कि एकदाच आहे, हे लक्षात घ्यावे. 'एकाहात्तर' असेही लिहिले जाण्याची शक्यता असते; तीही चूक टाळावी.
औदासीन्यउदासीन या विशेषणापासून औदासीन्य हे भाववाचक नाम तयार झाले आहे. या शब्दात 'स'ला दुसरी वेलांटी आहे, हे ध्यानात घ्यावे. तटस्थ, अलिप्त, तिऱ्हाईत हे उदासीन या शब्दाचे अर्थ. उदास याही विशेषणाचा अर्थ उदासीन असा होतो. खिन्न असाही त्याचा अर्थ आहे. अलिप्तता, तटस्थता हे जसे औदासीन्य या शब्दाचे अर्थ आहेत, तसेच, बेफिकिरी, निष्काळजीपणा, खिन्नता याही अर्थांनी तो वापरला जातो.
कंदीलकंदील हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. हा मूळचा अरबी शब्द. मूळचा तो स्त्रीलिंगी आहे पण मराठीत पुिंल्लगी आहे. यात दवर दुसरी वेलांटी; पण चुकून ती पहिली दिली जाण्याची शक्यता (कंदिल) असते. त्याचे सामान्यरूप होताना मात्र पहिली वेलांटी द्यायची, हे लक्षात ठेवावे. कंदिलावर, कंदिलाची, कंदिलात ही याची काही उदाहरणे. (कंदीलात, कंदीलाचे असे लिहिणे चूक.)
कर्कशकर्कश या शब्दांचे अनेक अर्थ आहेत; पण 'कर्णकटू हा त्याचा अर्थ अधिक रूढ आहे. हा शब्द 'कर्कश्श' वा 'कर्कश्य' असा उच्चारण्याची चूक अनेकांकडून होते. यातील शेवटचे अक्षर 'श' आहे; त्याला कोणतेही अक्षर जोडलेले नाही; हे ध्यानात घ्यावे. क्रू र, कठोर, वाईट स्वभावाचा, हे देखील 'कर्कश'चे अर्थ आहेत. 'कर्कशा'चा अर्थ भांडकुदळ स्त्री, त्राटिका असा आहे.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide