सैराट बाबत

     सैराट  हा चित्रपट मी अजून पाहिलेला नाही. सोशल मिडियावर दोन मतप्रवाह वाहत आहेत .
एका प्रवाहानुसार - पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वावर गेल्या पाच वर्षात खूप  चित्रपट आले. त्यांचा आता अतिरेक झालेला आहे. शिवाय, या चित्रपटांमुळे चुकीचा संदेश जात आहे. ज्या वयात ज्वलंत समस्यांवर विचार करायचा त्या वयात प्रेमगीते गायला असे चित्रपट शिकवत आहेत. यातील प्रेमाला प्रगल्भता नाही... इत्यादी इत्यादी.
दुसऱ्या प्रवाहानुसार - असे चित्रपट पूर्वी मराठीत आले नव्हते, आता येत आहेत  हे मराठी चित्रपटाचे वेगळे वळण आहे. मराठी चित्रपटाने कात टाकली आहे. 
मराठीत चांगले प्रयोग चालले आहेत. नवपिढीच्या कोंडलेल्या भावनांना वाट मोकळी होत आहे. आधीही व्यसने, मारामाऱ्या दाखवणारे असंख्य सिनेमा आलेले होते...इत्यादी इत्यादी.

काय वाटते ?