मे ३० २०१६

मदत - भाषा

हा लेख नाही, चर्चेचा प्रस्ताव नाही, ही एक मदती करता चाचपडणी आहे.
मी अनेकदा वर्तमानपत्रां करता, एका दर्जेदार मराठी मासिका करता निबंध वजा लेख लिहीतो. अनेक निबंध इतरांनी त्यांच्या पुस्तकात घेतले आहेत. पण आयुष्याची पन्नास वर्षे दिल्लीत काढल्याने माझे मराठी व्याक्रण संपादकांची अपेक्षा असते तितके शुद्ध नाही. तर, लेख पूर्ण झाल्या वर भाषा दुरुत करण्या करता मला कोणी भाषा तज्ञ मदत करू शकेल का? मी लेख ईमेल ने पाठवू शकतो / किंवा प्रिंट करून पण पाठवू शकतो. दुरुस्त्या मला पाठाविण्या करता पण अनेक उपाय आहेत. माझ्या ई-लेखातच दुरुस्ती करणे व तो मला ई मेल करणे;  मला फोन करून दुरुस्त्या डिक्टेट करणे व मी त्या हातोहात संगणका वर करणे; इत्यादी. इथे सर्वां समक्ष उत्तर दिले तरी चालेल; मला वेगळे पाठवायचे असल्यास cmpandit@yahoo.com या पत्या वर पाठविता येईल. मानधनाची अपेक्षा असल्यास तो  विचार पण करता येईल.

चेतन पंडित

Post to Feed

एक उपाय/मार्ग
धन्यवाद
असे करावे ...
प्रयत्न केला, पण झाले नाही.
पाठवला
शुद्धलेखन आणि व्याकरण सुधारणा
धन्यवाद

Typing help hide