मी बी शेतकरी होईन म्हणतो

(टीप - ही वात्रटिका आहे. पण कवितांचे प्रकार यात "वात्रटिका" असा प्रकार नव्हता. विडंबन म्हणता आले असते, पण मग "विडंबन कशाचे" हा प्रश्न उपस्थित झाला असता, व त्याचे उत्तर सहज सापडले असते. हा सर्व वाद टाळन्या करता "चारोळ्या" गटात टाकले आहे. पण आहे वात्रटिकाच. फार गांभीर्याने घेऊ नये. माझ्या घरावर मोर्चा काढू नये. पण अगदीच हसण्यावारी पण नेउ नये )

मी बी शेतकरी होईन म्हणतो
मोफत पाणी मोफत वीज
सबसिडाईझ्ड खते आणी सबसिडाईझ्ड बीज
इनकमटॅक्स तर दूरच पॅनकार्ड पण नाही
स्कॉरपियो करता पैसे कुठून आणलेस विचारण्याची  सोयच नाही
पाउस चांगला झाला तर सोने खरेदी करावी
चांगला नाही झाला तर कर्ज माफी मागावी
लावून द्यावा ऊस, मशागतीचे कामच नाही
सगळा वेळ राजकारण, आमदारकी फार दूर नाही
म्हणून
मी बी शेतकरी होईन म्हणतो