ओळखीचे क्षण...

ओळखीचे क्षण...

ओळखीचेच शब्द
ओळखीचेच तारे
ओळखीच्याच वाटा
ओळखीच्या लाटा

सारे काही आहे ओळखीचे
पण त्यामध्ये तू नाही
उजाडले तरी माझी
रात्र संपत नाही

पाहू किती वाट
डोळे मिटत नाही
ओळखीचेच सारे क्षण
पुन्हा भेटत नाही

आता तरी ये
दे ओळख मला तू
आजकाल आरसा पण
मला ओळखत नाही

राजेंद्र देवी