नोव्हेंबर १५ २०१६

सांगा

बंधने झुगारणे माझ्याच हाती 
मानणे ना मानणे माझ्याच हाती 

कापलेले पंख किती उडणार सांगा 
प्रगतीची वाटचाल कशी करणार सांगा

दूर चाललेले ध्येय कधी गाठणार सांगा
वेग मोकळा कसा मी सोडणार सांगा 

छत्र पित्याचे हरवले कसे सांगणार सांगा 
रांगणाऱ्या बालकाला कशी समजावणार सांगा 

जीवनाला ऊत आला , भोवताली काळ माजला
हरवलेले सर्वस्व तिला कसे मिळणार सांगा 

Post to Feed


Typing help hide