तेजाब

तेजाब हा सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी आलेला  व गाजलेला चित्रपट एका वाहिनीवर नुकताच पाहिला. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आपल्यापैकी अनेकजण शाळेत असतील किंवा महाविद्यालयात असतील. माझ्याप्रमाणे, अनेकांनी हा चित्रपट वाहिनीवर अलीकडच्या काळात पाहिला असेल. माधुरी दीक्षितचे गाणे, अनिल कपूरची दमदार अदाकारी, किरणकुमारचा लोटिया पठाण  हे लक्षात राहण्यासारखे होते.तसे पाहिले तर हीही एक नेहमीची सूडकथाच होती. नायक, नायिका, खलनायक. 

हा चित्रपट गाजण्यासारखाच होता, असे वाटते की  फारसे काही गाजण्यासारखे नव्हते असे वाटते ?
अनेक  वर्षांनी हा चित्रपट पाहून  कसे वाटते ?