ऑक्टोबर १४ २०१६

तीच का माझी खरी

तीच का माझी खरी सुरुवात होती 
भेटलेली अक्षरे शब्दात  होती 

मी तिच्या दुःखास ही त्याचाच वाटे 
कोणती जादू अशी माझ्यात होती

जीवना पंगत तुझी गम्मत असावी
जी नको ती गोष्ट ही ताटात  होती 

फेल तू झाला तुला कळलेच नाही
उत्तरे दडली तिच्या प्रश्नात  होती 
            -स्नेहदर्शन 

Post to Feed


Typing help hide