ऑक्टोबर २७ २०१६

माझे तुझे पटले किती

सांग ना माझे तुझे पटले किती
अन तुझ्यासाठीच मी झटले किती

मी न केलेल्या गुन्ह्याची ही सजा
रोजचे मोजायचे खटले किती

जी नको ती द्यायचा आभूषणे
रंगमंचावर तुझ्या नटले किती

हात मदतीचा दिला म्रुत्योस अन,
दाम आयुश्या तुझे घटले किती

गोष्ट लाखोंची जरी सांगायचा
चेक बँकेचे तसे वटले किती ??
        -स्नेहदर्शन 

Post to Feed


Typing help hide