ध्यास

ज्ञानाचा ध्यास घेतला
सार्‍या पदव्या मिळाल्या
    तरीही अतृप्त मी ...
धनाचा ध्यास घेतला
करोडो सोनकवड्या वेचल्या
    तरीही अतृप्त मी ...
सुखाचा ध्यास घेतला
अ़द्ययावत् साधने भोगली
    तरीही अतृप्त मी ...
तृप्तीचा ध्यास घेतला
यच्चयावत् चवी चाखल्या
    तरीही अतृप्त मी ...
आनंदाचा ध्यास घेतला
दाही दिशा धुंडाळल्या
    तरीही अतृप्त मी ...
अतृप्तीचा वीट आला
आयुष्याचा नाश झाला
    अंती अनंत आठवला!
ज्ञानाचा कंद गवसला
सकल निधी अवलोकिला
    आनंदनिर्झर वाहू लागला...
आता धाव सागराकडे
अनंत अपार प्रशांत
मंद मंद लहरती तरंग
    तेथ पद्‌नाभ पहुडला...