ऑगस्ट १८ २०१८

लव्ह ट्रँगलहिच्यासाठी झुरू की तिच्यासाठी उरू
कोणासाठी किती आणि काय काय करू

पिझ्झासाठी तिचा बाळहट्ट
पोळीभाजीशी हिची मैत्री घट्ट
आपलं काय, भाजीच टॉपिंग
पिझ्झासोबत खाऊ
कोणासाठी किती आणि काय काय करू

साडी घालताना तिचा चेहरा त्रस्त
हिची काळजी साडी परंपरेचा अस्त
आपलं काय, मोगऱ्याचा छान
सुगंध दोघींना माळू
कोणासाठी किती आणि काय काय करू

तीचं प्रेम, वारा सुसाट बेफाम
हीची माया, वृक्ष थकलेला स्तब्धखोल
आपल काय, कधी झाडाच गर्द हिरवं पान
कधी वाऱ्या बरोबर पाचोळा बनू
कोणासाठी किती आणि काय काय करू

Post to Feed

लेखनाचा अनुक्रमणिकांमधील उल्लेख
प्रेमाचा त्रिकोण

Typing help hide