डिसेंबर ११ २०१८

भेटुनी...

एकदा घेऊच आता भेटुनी
वेळ काही येत नाही सांगुनी...
काय त्या भेटीत घडले आधिच्या?
मागचे मागेच देऊ सोडुनी...
सारखा अस्वस्थ आहे, जाउ दे
ही तशी माझी सवय आहे जुनी...
भेट म्हणजे भेटवस्तू का असे?
सहज जी देतोहि आपण टाकुनी...
भेटण्याची मागणी माझी 'अजब'
तू तरी बसशील डोळे लावुनी...

Post to Feed


Typing help hide