जानेवारी १८ २०१९

हा उन्हाचा गाव आहे .......

हा उन्हाचा गाव आहे रापलेली माणसे

का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे.


जात धर्माच्या इथे ही पेटता या दंगली

पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे.


शेत कसवी तोच येथे का उपाशी राहतो?

का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे.


पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा

चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे.


हो भले अथवा बुरे ना काळजी येथे कुणा

का मनाने येथली ही गोठलेली माणसे?

Post to Feed


Typing help hide