दत्तक अपत्य

कारा ही संस्था सध्या भारतात दत्तक अपत्याच्या संबंधीचे सर्व कामकाज बघते. ज्या पालकांना दत्तक अपत्य घ्यावयाचे आहे, त्यांनी (उभयतांनी) तिथे नोंदणी करावी लागते, कुटुंबाचे छायाचित्र द्यावे लागते आणखी काही कागदपत्रे द्यावी लागतात. मग, ज्या संस्थेतून तुम्हाला अपत्य दत्तक घ्यावयाचे आहे, त्या संस्था निवडाव्या लागतात.
माझा प्रश्न असा आहे की,
समजा, मला कोणत्याही संस्थेतून वगैरे दत्तक घ्यावयाचे नाही. माझे एक परिचित कुटुंब आहे त्यांना दोन अपत्ये आहेत, पण त्या परिवाराची दोन अपत्यांना पोसण्याची आर्थिक म्हणा अगर इतर अशी कुवत नाही. आता मला, त्या कुटुंबातील एक अपत्य दत्तक घ्यावयाचे आहे. तशी त्या परिवाराचीही तयारी आहे.
अश्या परिस्थितीतही मला कारा प्रक्रियेतून जावेच लागेल काय? काराच्या संकेतस्थळावर दिलेल्या संस्थेतून दत्तक घेणे आणि मी आता जसे म्हणतोय तसे दत्तक घेणे ह्या दोन्ही साठी काराची तीच पद्धत आहे का?
मुळात, कारा अश्या दत्तकप्रक्रियेत काय भूमिका निभावतं? इथंही काराला कळवावंच लागतं का?

मनोगत वर कुणाला सविस्तर माहिती असेल तर त्याने अगर तिने कृपया ती द्यावी, ही विनंती.

कळावे,

आपला मनोगती,

कृष्णकुमार द. जोशी.