जून १९ २०१९

मी आणि तू

मी आणि तू .. मला दुसरे काही नको 

डोळ्यांचीच भाषा बोलू .. शब्द सुद्धा नको


बस असा शेजारी .. फक्त हात घे हातात 

चंद्राचाच लावु दिवा .. रात्र काळी नको


ओघळू दे केसातून .. काही फुले हातावर 

श्वासांनाच मोजू फक्त .. तारे बिरे नको


करू देत वार्याला .. किती खेळ बटांशी 

डोळे म्हणतील नाही जरी .. त्याचं ऐकू नको


होऊ दे पहाट ...... अन मावळू दे ना चंद्र 

तुझे ..माझे.. आता असे..काही ठेऊ नको


Post to Feed

किती

Typing help hide