माझे घर

खाली होते, वर होते,

भिंतींचे चार पहारे होते,

एवढेसे माझं घर होते

थोडीशी माती, थोडेसे दगड होते

एक लाकूड मणक्यासारखे,

बस,  एवढेसेच माझं घर होते


उंदीर होते, मांजर होते,

एक उपद्रवी पाल ही होती,

काय करायचं, त्यांच ही ते घर होते

एवढेसे माझं घर होते

आई, बाबा, आजी, आजोबा,

ताई, मित्र सर्व एकत्र होते,

एकेकाळी, देवांच ही वास्तव्य होते

असं  माझं घर होते