ऑक्टोबर ११ २०१९

मुक्तांगण

नको आहे कुणाचा आधार
नको असतो आम्हाला खोटा आशावाद
ताठ मानेने जगतो आम्ही
नको आहे आम्हाला कोणाचा निराशावाद....
स्वाभिमान जपतो आम्ही
नको आहे आम्हाला कुणाचा अपमान....
पंख हे आमचे गगन भरारी चे
नको आहे आम्हाला पिंजर्‍याचे झोके....
स्व: बळावर कमवितो आम्ही
नको आहे आम्हाला उपकाराचे ओझे....
एकटे- दुघटे नसतोच कधी आम्ही
कारण आमच्या मध्ये गिरवले जातात
आत्मविश्वासाचे धडे....

-श्वेता वासनिक

Post to Feed


Typing help hide