ऑक्टोबर ३१ २०१९

सुटलो!

सुटलो. 
कोणी कोणाला पकडले होते नाही माहीत. 
पण सुटलो. 
कुठलाच आकार, 
कुठलाच भाव-विचार,
कुठल्या ईच्छांकांक्षा, 
कुठली प्रवृत्ती,
कुठले वस्तुमान,
काही काही नाही. 
आजवर घट्ट पकडून ठेवलेले सगळे सगळे विस्मृतीमध्ये जाते आहे. 
नाव..
ओळख..
कर्तृत्व..
नाती..
"काहीही न वाटणे!" ह्यामध्ये एक गूढ जल्लोष असतो असं नेहमीच वाटायचे मला! 
अनेकदा ते साधण्याचे माझे अयशस्वी प्रयत्न मला अस्वस्थ करीत..
आता - हे असे का होई ना! - आपोआपच त्या दशेचे वळण आले आहे तर त्या दिव्याचा पुन्हा एकदा भाग होण्याहून अधिक प्रिय बाकी काही नाही!

"अरे गणिताचा पेपर आहे ना आज..लोळत काय पडलाय!" सिद्धार्थला त्याच्या तीर्थरूपांची एवढी शाब्दिक लाथ भौतिक विश्वात आणायला पुरेशी होती!

Post to Feed




Typing help hide