ऑक्टोबर ३१ २०१९

व्हावे वाटे!

मला तिची ना..
फुला फुलांची...
गोल खोल अन..
रंगीत नाजुक..
व्हावी वाटे 
साडीवरली रेखीव नक्षी!!

मला तिच्या ना,
कुंतलांतले,
तिज स्पर्शाने
जे झाले ते
व्हावे वाटे 
पुष्प सुगंधित..

मला तिचा तो,
गहिऱ्या नयनी
वसलेला त्या
नकारांतला,
व्हावा वाटे,
तिचा इशारा!  

मला तिचा तो
सर्वांपासून
लपलेल्या त्या,
नेमक्या स्थळींचा
व्हावा वाटे
कृष्ण गोल व्रण!!

मला तिची ती,
सुडौल वजनां,
तोलून धरण्या,
कटिवस्त्रांतिल
व्हावी वाटे
तार ती सक्षम!  

मला तिचे ते...
प्रणय प्रतारित
आर्त आतल्या
उसास्यांतले,  
व्हावे वाटे,
उष्ण वायुकण!

मला तिचा ना,
सोबतींतली,
रात्र कल्पता,
गलांवरला
व्हावा वाटे
रंग गुलाबी!!

Post to Feed


Typing help hide