नोव्हेंबर २०१९

रंजीश ही सही..

"रंजीश ही सही.." 

मेहंदी हसन ने धरलेली ती तान खूप खोल खोल नेत होती मला... 

संगीत, काव्य बहुधा मनुष्याने बनवलेली सर्वाधिक सुंदर गोष्ट असावी! 

तिच्या 
"अरे, इथून डावीकडे.." नी 
ठिकाणावर आलो आणि घराकडचे ते वळण कसं बसं साधलं!

टपोऱ्या डोळ्यांनी 
"लग्नाला 5 वर्षे होऊन अजून सासरचा रस्ता मला सांगावा लागतोय?" 
असा तिचा नेहमीचा वर्षे बदलून विचारलेला प्रश्न, 
आणि

मी मनातल्या मनात तिचा हात धरून परत 
"दिल ही दुखाने के लिये आ..." च्या मैफलीत चल म्हणत होतो! 

तीचं माझ्यासारखं नसणं हे कधी कधी टोचत जरी असलं तरी अनेकदा कैफ ओसरल्यावर त्याबद्दल आभारच मानले आहेत मी ढगातल्याचे! 
दोघं ही तितकेच रमलो असतो अशा मैफलीत तर न जाणे किती वळणं चुकली असती आजपर्यंत!

Post to Feedनक्की

Typing help hide