देशप्रेमी तील तार्किक चूक

'देशप्रेमी' या चित्रपटाच्या अखेरीला एक प्रसंग आहे. मास्टर दीनानाथला उचलण्याकरिता काही गुंड येतात. मास्टर दीनानाथच्या वेषातील टोनी या दीनानाथांच्या मुलाला पकडतात.
मास्टरने वस्तीतील अनेकांना मदत केलेली असते. त्यामुळे ती मंडळी गुंडांना रोखू पाहतात. वस्तीतील दीनानाथांचे बंगाली, पंजाबी, मुसलमान व दाक्षिणात्य सहकारी  एकजुटीने गुंडांना प्रतिकार करतात व मास्टर दीनानाथांची यशस्वीपणे सुटका करतात.
इथे एक तार्किक चूक दिसते. - बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य व्यक्तीं या भाषांच्या प्रतिनिधी आहेत. चौथी व्यक्ती धर्माची प्रतिनिधी आहे. चौथी व्यक्ती कोणत्यातरी चौथ्या भाषेची प्रतिनिधी दाखवणे अधिक तर्कशुध्द होते.  
किंवा 
हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती व शीख असे धार्मिक प्रतिनिधित्व दाखवले असते तरीही ते तर्कशुध्द झाले असते.

काय वाटते ?
तुम्हाला तुम्ही पाहिलेल्या चित्रपटातील अशा त्रुटी, चुका दिसल्या आहेत का? असतील तर वाचायला आवडेल.