जानेवारी २६ २०२०

स्थळ, काळ आणि अंतर

सकाळची न्याहारी संपवल्यावर मी श्री रमणाश्रमातल्या पुस्तकांच्या दुकानातून रमण महर्षींचे एक छायाचित्र विकत घेतले. महर्षींच्या स्वत:च्या हातून ते आपल्याला मिळावे अशी माझी ईच्छा होती. ते छायाचित्र हातात घेऊन मी दिवाणखान्यात गेलो तेव्हा महर्षी जागे असलेले बघून मी त्यांना मनोभावे दंडवत घातले. त्या वेळी दिवाणखान्यात जवळजवळ शुकशुकाटच होता. माझ्यासाठी हे थोडे विस्मयकारकच होते. मी महर्षींना सांगितले की त्यांचे एक छायाचित्र मी विकत घेतले आहे आणि त्यांच्याच हातून ते मिळावे अशी माझी ईच्छा आहे. एवढे बोलून मी छायाचित्र त्यांच्याकडे सुपूर्त केले. महर्षींनी कृपावंत होत आपले हात लांबवत ते छायाचित्र हातात घेतले आणि एकही शब्द न उच्चारता काही क्षण त्याचे निरीक्षण केले. त्यानंतर प्रसन्न चित्ताने ते मला परत केले. छायाचित्र स्वीकारताना मला विलक्षण समाधान मिळाल्याचा वेगळाच अनुभव आला.

नंतर आश्रमातून माघारी परत फिरण्यापूर्वी मला त्यांचे शुभाशिर्वाद घ्यायचे होते. त्यामुळे मी परत एकदा त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्याकडे बघत थोडा वेळ तिथेच उभा राहिलो. मी इंग्रजी भाषेत त्यांच्याशी संवाद साधला, "भगवान, आपल्या सहवासात मला असीम शांतीचा आनंद लुटता आला. आता मला बंगलोरला परत जाण्याची परवानगी द्या. बंगलोरला पोहोचल्यावरही मला आपली मदत मिळू शकेल का हे कृपया सांगाल का? आपले आशिर्वाद मिळावेत या साठी मी प्रार्थना करतो." महर्षी त्यावेळी एका कोचावर पहुडलेले होते. त्यांनी माझ्या निरोप घेण्याच्या प्रसंगाला काहीसे नाट्यमय वळण दिले. ते कोचावरच ताडकन उठून बसले आणि अत्यंत मृदु पण खणखणीत स्वरात इंग्रजी भाषेतच बोलायला लागले, "हा काय प्रश्न झाला? माझ्यासाठी स्थळ, काळ किंवा अंतर या गोष्टी खरोखरच अस्तित्वात आहेत का?" मला हा प्रश्न विचारून ते कोचावर ठेवलेल्या उशीवर मान ठेवत पहुडले आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. त्यांचे ते शब्द आणि हावभाव अत्यंत रोमांचक, उद्बोधक आणि करूणेने ओथंबलेले होते. आपल्याकडून मदत मिळावी अशी प्रार्थना करणार्या सगळ्यांबद्दलची निरंतर कृपादृष्टी आणि निस्सीम प्रेम महर्षींच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत असे. आज चौतीस वर्षे उलटल्यावरही त्यांचे करुणेने ओथंबलेले शब्द माझ्या कानात रूंजी घालत असतात.

(टी एस अनंतमूर्ती यांनी सांगितलेली आठवण, 'द लाईफ अँड टिचींग्ज ऑफ श्री रमण महर्षी' या पुस्तकातील वेच्याचा भावानुवाद)

Post to Feedहे सत्याचं सार्वत्रिक वर्णन आहे !
संजय, धन्यवाद!
तो पूर्ण शेर असा आहे
रमण महर्षींचंच
एक बरे असते,
पंडीतजी, हे तुमच्या आकलनापलिकडे आहे
संदर्भ
माझ्या मते
तुमचे काय मत आहे ?
माझे मत ...
जाणीव हा इतका मोठा लफडा नाही !
एक कळकळीचा सल्ला
मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही या फंदात पडू नका
मूळ लेखाविषयी लक्षात घेण्याजोगे काही मुद्दे
विषय संपला
श्री.चेतन पंडित याना
एक गहन प्रश्न
सध्या !

Typing help hide