फेब्रुवारी २०२०

'इमॅजिन' (कल्पना कर...)

ब्रेक्झिटचं 'औचित्य'(! ) साधून... जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद...

सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर...
नरकही नसेल अन् होईल आकाश घर!
(कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर... )

न देश, न देशभक्ती, मारण्या-मरण्यासाठी
न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर
(कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर... )

भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर...
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर! )

लोभ, मोह, न अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची
निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर...
(कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर! )

भासेल स्वप्न हे माझे, येतील ज्यात इतर
अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर...
(कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर!)

- कुमार जावडेकर

Post to Feed


Typing help hide