फेब्रुवारी २८ २०२०

समानता

समानता

अनेक सामाजिक दंभांचे बिरुद मिरवता मिरवता मेटाकुटीला येणाऱ्या माझ्या अतिसामान्य जीवाला सगळ्यात जास्त धास्ती आहे ती समानतेच्या सामाजिक दंभाची! 

"स्त्री-पुरुष" ही तर त्यामधली सगळ्यात जास्त दांभिक! जन्मानेच वेगळे बनवलेल्या ह्या दोन जमातींना त्या समसमान आहेत असे भासवण्याचा अट्टहास मुळात कशासाठी तेच मला कळत नाही!
आणि बरं 
ह्या जन्मानेच विभिन्न असलेल्या
जमातींची विभिन्नता 
फक्त शारीरिक असती 
तरी एक वेळ केला ही असता प्रयत्न, 
पण ह्या जमाती 
तात्विकता, 
संवेदनशीलता, 
प्राथमिकता, 
आणि
नैतिक मूल्ये 
ह्या सगळ्याच गोष्टींत 
 (ज्यामुळे आपण माणसाला माणूस म्हणतो) 
त्यामध्ये एकमेकांपासून अगदी भिन्न असतात. 

आता हेच पहा ना,
एक जमात 
जी कुठल्याही अनौपचारिक (व हल्ली औपचारिक सुद्धा)
घटनेसाठी एकत्र येते 
तेव्हा अगदी नैसर्गिकपणे "अश्लील" सदरात बसणाऱ्या अनेक गोष्टी 
अगदी बेमालूमपणे 
सहजच्या चर्चेत देखील बोलून जाते... 
आणि 
अगदी अल्पसंख्येने जरी 
दुसऱ्या जमातीचे प्रतिनिधित्व करणारे कोणी 
त्या जमावाचा भाग असेल 
तर मग मात्र सगळे उपस्थित सभ्यतेची चौकट आपोआप पाळताना दिसतात. 

एकमेकांहून इतक्या वेगळ्या 
व 
एकमेकांवर इतका टोकाचा प्रभाव टाकणाऱ्या
ह्या समान कशा? 

हे आणि असे अनेक किचकट प्रश्न घेऊन मी माझ्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन निघालो होतो कोठेतरी. 
सवयीने फोनचा रेकॉर्डर सुरू केला. 
(कारण तो अतिशय मूल्यवान बडबड करत असतो गाडीच्या प्रवासात) 
तेव्हाच्या ध्वनिफितीमधला एक छोटा संपादित तुकडा 
(जो वरती लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ एकदम सहज स्पष्ट करतो,) 
तो येथे टाकतो आहे.

"आपल्यातल्या विभिन्नतेचा एकत्र येऊन संयुक्त विद्यमाने स्वीकार केल्यास निदान एका गोष्टीमध्ये तरी त्या उपजत विभिन्नतेवर आपण मात करू शकू..." 
अशा आशयाचे उत्तर द्यावे म्हणतो मी त्याला! 
काय म्हणता?

Post to Feed
Typing help hide